संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

इंडोनेशियात बोटीला भीषण आग! १४ प्रवाशांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

जकार्ता- इंडोनेशियाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील कुपांग येथून कालाबाहीकडे जात असलेल्या प्रवासी बोटीला भीषण आग लागली. त्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. या बोटीत २३० प्रवासी आणि १० क्रू मेंबर्स होते, अशी माहिती इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. १७ हजारांपेक्षा जास्त बेटांचा द्वीपसमूह असलेल्या इंडोनेशियात बोट दुर्घटना सामान्य आहेत. तेथे नेहमी प्रवासी बोटींना अपघात होतात. त्यात अनेकांचे बळी जातात. तेंगारा प्रांतात अशीच एक दुर्घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बोटीला आग लागली. त्यात १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. काहीजण बेपत्ता आहेत. बोटीवरील २०० पेक्षा अधिक जणांना वाचवण्यात यश आले. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, असे इंडोनेशियाच्या पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami