संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 28 January 2023

‘इंडिगो’ची औरंगाबाद-मुंबई
सायंकाळी विमानसेवा सुरू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातून काल १ डिसेंबरपासून मुंबईला दरराेज ५५२ प्रवासी नेणाऱ्या विमानाने उड्डाण केले.एअर इंडिया आणि इंडिगोच्या विमानाने आतापर्यंत ३६६ प्रवासी मुंबईला जात होते.आता इंडिगाे काल गुरुवारपासून दरराेज सायंकाळी नियमित विमान सुरू केली आहे. या सेवेमुळे राेज अतिरिक्त १८६ प्रवासी शहरातून मुंबईला जाता येणार आहे.
मुंबईकडे जाणारा प्रवाशांचा ओघ लक्षात घेता महिनाभरात एअर बस विमान सुरू केले जाणार आहे.यामुळे सायंकाळच्या विमानाने अतिरिक्त २२२ प्रवासी जाऊ शकतील, अशी माहिती इंडिगोच्या नागरी उड्डयन समितीचे चेअरमन तथा जनसंपर्क अधिकारी सुनीत कोठारी यांनी दिली.मुंबईसाठी एअर इंडियाचे औरंगाबादहून सकाळी ८.५० वाजता १८० प्रवासी क्षमतेचे विमान आहे. इंडिगोचे १८६ प्रवासी क्षमतेचे विमान सकाळी ७.०५ वाजता आहे. इंडिगोने १ डिसेंबरपासून १८६ प्रवासी क्षमतेचे विमान सायंकाळी दररोज ७.१० वाजता सुरू केले आहे.
दरम्यान,उदयपूरची सेवा २०२३ मध्ये टुरिस्ट सर्किट जोडण्यासाठी औरंगाबाद ते उदयपूर विमानसेवा नोव्हेंबर २०२३ पर्यंत सुरू हाेणार आहे.या वर्षीचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. विदेशातील काेराेनाचा प्रभाव ओसरला नसल्याने अद्यापही पर्यटकांची संख्या वाढली नाही. त्यामुळे विमानांची संख्या कमी असून प्रवास महाग आहे. कोविडपूर्वी औरंगाबादहून बंगळुरू व अहमदाबाद सेवा आठवड्यातील काही दिवस सुरू करण्यात आली होती. इंडिगोच्या सेवेला चांगला प्रतिसाद होता.मात्र, काेराेनामुळे दाेन्ही सेवा बंद झाल्या.दोन महिन्यांत पुन्हा विमानांची उपलब्धता झाल्यानंतर इंडिगो अहमदाबाद आणि बंगळुरूला विमान सुरू करेल, असे कोठारी म्हणाले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami