लंडन- इंग्लंडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन कायम ठेवले आहे. यामुळे रेल्वे सेवांवर मोठा परिणाम झाला असून नाताळआधी संप पुकारल्यामुळे गिफ्ट आणि पार्सलचा मोठा ढीग साचला आहे. यामुळे लोकांना वेळेत गिफ्ट मिळण्यात अडचणी येत आहेत.
ब्रिटनमध्ये सुमारे 40 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनवाढ करण्याच्या मागणीसाठी संप केला आहे. कारण, वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. याआधी रेल्वे संघटनांनी सरकारचा वेतन व कामाच्या स्थितीचा नवा प्रस्ताव फेटाळला आहे. ब्रिटनच्या बहुतांश सार्वजनिक सेवा रद्द केल्या असून या संपादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्त्वाच्या सार्वजनिक सेवांत लष्कर तैनात करण्यात आले असून नाताळ गिफ्टनिमित्त दुकान, हॉटेल आणि रेस्तराँ व्यवसाय नुकसानीत सापडण्याचा धोका निर्माण झाला आहे.13 तारखेपासून पुकारलेल्या संपाचा उद्या शनिवारी शेवटा दिवस आहे.