संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आसामची पूरस्थिती अद्याप गंभीर! ७३ नागरिकांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गुवाहाटी – आसाममधील पूरस्थिती अद्याप गंभीर दिसत आहे.राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्हे प्रभावित झाले आहेत.१२५ महसूल मंडळांतर्गत एकूण ५४२४ गावे पूरग्रस्त भागात असल्याची नोंद आहे. या पुरामध्ये आतापर्यंत ७३ जणांचा मृत्यू जणांचा बळी गेला असून ४७ लाख ७२ हजार १४० लोक विनाशकारी पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

दुसऱ्यांदा आलेल्या या पुरात काल सोमवारी प्राण गमावलेल्यांची संख्या ११ होती. एकूण ३३ लाख ८४ हजार ३२६ जनावरांना पुराचा फटका बसला आहे. या पुरात एकूण ५२३२ जनावरे वाहून गेली आहेत. बचाव पथकांचे काम सुरूच आहे.एनडीआरएफ, एसडीआरएफ,भारतीय लष्कर,अग्निशमन दल इत्यादी पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरू ठेवत आहेत.पूरग्रस्त भागात एकूण १४२५ छावण्या उभारण्यात आल्या आहेत. एकूण २ लाख ३१ हजार ८१९ लोकांनी राज्यभरातील छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami