संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

आष्टीमध्ये ट्रकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मुत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आष्टी – बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दुचाकीला मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने दोन शेतकऱ्यांचा जागीच मुत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. बाबासाहेब गर्जे (45) आणि नारायण गोल्हार(43) अशी मृतांची नावे आहेत.

कडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सकाळी कांद्याचा लिलाव सुरु होता. त्यावेळी या लिलावासाठी खिळद येथील शेतकरी बाबासाहेब गर्जे आणि नारायण गोल्हार हे दुचाकीवरुन येत असताना पैठण बरामती रोडवर लोंखडाने भरलेला ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोघांचा जागीच मुत्यू झाला. एवढे होऊनही ट्रक चालकाने ट्रकखाली गुतलेली दुचाकी एक किलोमीटर अंतरावर ओढत नेली. अखेर लोकांनी ट्रक अडवला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या