संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

आरबीआयचा धक्का; रेपो दरात वाढ, कर्ज महागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपले नवे पतधोरण जाहीर केले. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ केली. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व्ह बँकेचा रेपो दर ४.९० टक्के इतका झाला आहे. या व्याजदर वाढीने सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहेत. शिवाय कर्जफेड करताना ईएमआयसाठी जादा तरतूद करावी लागेल. यापूर्वीही रिझर्व बँकेने आपल्या दरामध्ये ०.४० टक्क्यांची वाढ केली होती.

‘रेपो’ म्हणजे असा दर, ज्या दराने बँका रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतात. हा दर वाढल्यास आता बँकांना जास्त दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांकडून अधिक दराने व्याज घेतील. दरम्यान, आरबीआय पतधोरण समितीची बैठक मागील दोन दिवस सुरू होती. या बैठकीत रेपो दर आणखी ०.५० टक्क्यांनी वाढवण्यास एकमताने निर्णय घेण्यात आला असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. तर, उर्वरित वर्षभरात महागाई दर ६ टक्क्यांवर राहील, असे आरबीआयने म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami