संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

आरएसएसची कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – उत्तर प्रदेशातील लखनऊच्या अलीगंज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळताच सगळीकडे गोंधळ उडालाय. अलीगंज येथे राहणाऱ्या नीळकंठ मणी पुजारींना व्हाट्सऍपवर धमकीचे मेसेज मिळाले. मेसेजमध्ये लखनऊसह आरएसएसच्या इतर सहा कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. याबाबत डॉ. नीळकंठ पुजारींनी मडिगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर गुन्हे शाखा याबाबत तपास करत आहे.

दरम्यान, डॉ. नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून कार्यरत असून ते आरएसएसचे जुने स्वयंसेवक आहेत. त्यांना हिंदी, इंग्लिश आणि कन्नड भाषेत धमकीचे मेसेज मिळाले. या मेसेजमध्ये आरएसएसच्या उत्तर प्रदेशसह कर्नाटकच्या सहा ठिकाणांना रविवारी रात्री आठ वाजता बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami