संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ईडीची धाड! १६६ कोटींची मालमत्ता जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली :- आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून तब्बल १६६ कोटीं रुपयांची मालमात्त जप्त केली आहे. आयकर विभागाकडून बोगस मार्गाने उपलब्ध झालेल्या २६३ कोटी रुपयांचा परतावा वैयक्तिक बॅंक खात्यात वळवल्याचा आरोप या अधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. यासाठी ईडीने ही कारवाई केली आहे.

वरिष्ठ आयकर सहाय्यक अधिकारी तानाजी मंडल यांनी त्यांच्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करुन त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवले. त्यांनतर लॉगिन आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आर्थिक फसवणूक केली आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अतिरिक्त महासंचालक-४ यांच्याकडून लेखी तक्रार मिळाल्यानंतर त्याच्या दिल्ली युनिटने नोंदवलेल्या सीबीआय प्रकरणावर ईडीचा तपास आधारित आहे. या प्रकरणी ईडीने आता मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी लागू करुन १६६ कोटींची संपत्ती आणि मालमत्ता जप्त केली आहे. या मध्ये लोणावळा, खंडाळा, कर्जत, पुणे आणि कर्नाटकमधील उडुपी येथील जमिनी जप्त केल्यायत. यात पनवेल आणि मुंबईतील फ्लॅट्स आहेत. तसेच लक्झरी कार बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, ऑडीसारख्या आलिशान गाड्याच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये समावेश आहे.

अधिकारी तानाजी मंडल यांनी २६३ कोटींची रक्कम एसबी एंटरप्रायझेस नावाच्या फर्मच्या बँक खात्यात जमा केली होती. पैशांचे नियंत्रण मंडल यांचा साथीदार भूषण पाटील नावाच्या व्यक्तीकडे होते. ईडीच्या तपासात असे आढळून आले की, नोव्हेंबर २०१९ पासून २६३ कोटी रुपयांचे एकूण १२ फसवे टीडीएस रिफंड केले. जे एसबी एंटरप्रायझेसच्या खात्यात जमा झाले. २००७-०८ आणि २००८-०९ मूल्यांकन वर्षापासून प्रलंबीत दर्शविलेल्या दाव्यांवर परतावा दिला गेला. त्यानंतर पाटील आणि त्यांचे सहकारी आणि शेल कंपन्यांच्या इतर खात्यांमध्ये निधी वर्ग करण्यात आला. म्हणून ईडी ने पीएमएलए कायद्या अंतर्गत तपास सुरु केला ज्यात हे सगळे समोर आले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या