पणजी :
आयएनएस विक्रांतवर पहिल्यांदाच नौदल कमांडर्सच्या परिषदेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. ५ दिवस चालणाऱ्या या परिषदेतच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह नौदलाच्या सर्वोच्च कमांडर्सना संबोधित करतील. परिषदेत सुरक्षा संबंधित लष्करी आणि सामरिक पातळीवर महत्त्वाची चर्चा होईल. याशिवाय नौदलाने गेल्या सहा महिन्यांत केलेल्या ऑपरेशन्स, लॉजिस्टिक, प्रशिक्षण, मानवी संसाधन व्यवस्थापन आणि भविष्यातील योजना यावरही चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले. नौदलाच्या कमांडर्सची ही परिषद पहिल्यांदाच आयएनएस विक्रांतवर अरबी समुद्रात होणार आहे. यापूर्वी २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयएनएस विक्रमादित्य बोर्डावर जॉइंट कमांडर्स परिषदेला संबोधित केले होते. आयएनएस विक्रांत नौदलात दाखल होऊन सहा महिने उलटले आहेत. सध्या त्यावर तैनात करण्यात येणाऱ्या लढाऊ विमानांची चाचणी सुरू आहे.