संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

आम्हाला मृत्यूच्या दारात नेलं तरी बेहत्तर…एकनाथ शिंदेंच्या ट्विटमुळे खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जवळपास ४०च्या वर समर्थक आमदारांसह बंडाचे निशाण फडकवले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे सरकारमध्ये जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी खळबळ माजवणारे आणि भावनिक स्वरूपाचे दोन ट्विट काल रात्री उशिरा केले. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर…असे शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

कायदेशीर लढाईत एकनाथ शिंदे अडचणीत येण्याची शक्यता असताना त्यांनी दोन ट्विट केले आहेत. आपल्या ट्विटमधून त्यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे. सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांनी आघाडी सरकारवर नकार दर्शवला आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करू नये हेच त्यांचे म्हणणे होते. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणार्‍या दाऊदशी थेट संबंध असणार्‍यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल, आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर…त्यानंतर शिंदे यांनी केलेल्या दुसर्‍या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami