मुंबई – मंत्रालयातील अधिकाऱ्याला वाद घालून मारहाण केल्याप्रकरणी आरोपी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यांची पुढील सुनावणी 3 एप्रिलला सत्र न्यायालयात होणार आहे. कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यामुळे सत्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली.
26 सप्टेंबर 2018 रोजी बच्चू कडु यांनी सरकारी पोर्टलला विरोध करत आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्रालयात असलेले तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत बाचाबाची करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर आहे. दरम्यान,पाच दिवसांपूर्वी शासकीय कामात अडथळा आणि सरकारी अधिकाऱ्यांवर हात उगारल्याप्रकरणी बच्चू कडू यांना नाशिकच्या सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र त्यानंतर त्यांना दिलासा देत त्यांचा त्याच न्यायालयाने जामिन मंजूर केला. दिव्यांग कल्याण निधी खर्च केला नाही, या वादातून बच्चू कडूंनी महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्याचा आरोप होता. यासंदर्भात न्यायालयाने हा निर्णय दिला होता.