संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

आपने संगरुरचा मतदारसंघ गमावला शिरोमणी अकालीचा उमेदवार विजयी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्‍ली- पंजाबमधील संगरुर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिरोमणी अकाली दलाकडून आम आदमी पक्षाला (आप)मोठा दणका बसला. अकाली दलाचे उमेदवार सिमरनजीत सिंह मान यांनी आपचे उमेदवार गुरमैत सिंह यांना सात हजार मतांनी मात दिली.आपचे नेते भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाल्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. आजच्या पराभवामुळे आपने आपला हक्काचा मतदारसंघ गमावला.

उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार घनश्याम सिंह लोधी यांनी 42 हजार 48 मतांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार असीम राजा यांचा पराभव केला. असीम राजांच्या पराभवामुळे समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांना मोठा धक्का बसला आहे. रामपूर हा आझम खान यांचा बाल्लेकिल्ला समजला जातो. तसेच दिल्लीतील राजेंद्र नगर विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमीचे उमेदवार दुर्गेश पाठक 11 हजार 555 मतांनी विजयी झाले. या मतदारसंघातून आमदार असलेले राघव चड्ढा यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवरील पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने बाजी मारली. सुरुवातीच्या मतमोजणीत भाजप आम आदमी पक्षाला कडवी टक्कर दिली. मात्र चार फेर्‍यानंतर आम आदमी पक्षाने आघाडी घेतली. त्यानंतर आता आमदार दुर्गेश पाठक विजयी मिळावला. तसेच त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी आज टाउन बारडोवली विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला असून त्यांनी काँग्रेसच्या आशिष कुमार साहा यांचा 6,104 मतांनी पराभव केला. त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणे आवश्यक होते. आंध्र प्रदेशच्या आत्मकुर विधानसभा पोटनिवडणुकीत कांग्रेसचे विक्रम रेड्डी यांनी 82,888 मतांनी दणदणीत विजय मिळवत भाजपाच्या के जी भरत कुमार यादव यांना पराभवाचा धक्का बसला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami