संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आधी बाहुली, मग स्वतःही घेतला गळफास; पुण्यात ८ वर्षांच्या मुलाचे कृत्य

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – पुणे जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आई कामात व्यस्त असताना ८ वर्षांच्या मुलाने आपल्या बाहुलीला फाशी देऊन मग स्वतःही गळफास लावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील थेरगावमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एखाद्या कैद्याला फाशी देण्यापूर्वी चेहरा झाकतात अगदी तसाच त्याने बाहुलीच्या तोंडावर कापड बांधला होता. बाहुली आपल्याला सोडून गेल्याचा समज झाल्यानंतर या मुलानेदेखील स्वतःच्या तोंडाला कपडा बांधून घेतला गळ्याभोवती दोरी बांधून गळफास घेतला. या घटनेत या मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. संबंधित कुटुंब नेपाळी असून त्यांचा हा आठ वर्षांचा मुलगा सर्वात मोठा आहे. वडील याच सोसायटी सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सत्यवान माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेत मृत पावलेल्या मुलाला मोबाइलवर ‘हॉरर’ फिल्म पाहण्याची सवय होती. त्यामुळेच त्याच्याकडून असे कृत्य झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आता या प्रकरणाचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami