संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

आधि खिसे कापून मग किराणा वाटणारे महाठग कमी आहेत का?

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमरावती : येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती, या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली, दिवाळीनिमित्त राणा दाम्पत्य घरोघरी मोफत किराणा वाटत आहेत, यावर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याच नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, काही ठिकाणी मतं मिळवण्यासाठी नेत्यांना रक्ताची आहुती द्यावी लागते. मी रक्तदान करून निवडणुकीचा अर्ज भरला होता. राजकीय मंडळींनी दान करण्याची प्रवृत्ती ठेवणं महत्त्वाचं आहे. नाहीतर येथे आधी खिसे कापणारे आणि मग किराणा वाटणारे महाठग, महाअवलादी कमी आहेत का? असा सवाल करत आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अलीकडेच आपल्या मतदारसंघातील गरीब नागरिकांना किराणा वाटप केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक लाख लोकांना किराणा वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावरून अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जोरदार टीकास्र सोडले आहे. यावेळी बोलताना, बच्चू कडू म्हणाले, गोरगरीबांचे खिशे कापायचे, राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असे सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. त्यांनी अप्रत्यक्ष राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये याआधीही शाब्दिक युद्ध रंगल्याचे पहायला मिळाले आहे. आमदार रवी राणा यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर टीका केली होती. ‘जिथे पैसा तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भय्या, सबसे बडा रुपय्या!. मंत्रिपद मिळावं म्हणून गुवाहाटीला जाणार नाही. मंत्रिपद मिळो अथवा न मिळो मी कायम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिपाई बनून राहीन, असे म्हणत रवी राणांनी देखील बच्चू कडूंना डिवचले होते. तेव्हांपासून राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami