मुंबई – प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन या स्टार कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. मात्र या चित्रपटाचा टीझर पाहून प्रेक्षकांनी ट्रोलिंग सुरू झाले आहे. नेटकर्यांनी सैफ अली खान आणि प्रभासलाही ट्रोल केले. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सैफ अली खान रावणाचे पात्र साकारणार आहे तर क्रिती सीतेच्या भूमिकेत आहे. सैफच्या लूकवर प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आहे. सैफ रावणाची भूमिका साकारणार की अलाउद्दीन खिलजीची भूमिका करणार असा प्रश्न आता नेटकर्यांना पडला आहे. या चित्रपटात रावणाला दाढी दाखवण्यात आल्यामुळे प्रेक्षकांना हे आवडले नाही. दिग्दर्शक ओम राऊत यांनी रामायणातील पौराणिक गाथेवर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाची कल्पना त्याला जपानी निमेटेड फिल्म रामायण पाहिल्यानंतर सुचली.