संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 22 March 2023

आता लखनऊचे नाव बदलणार
लवकरच ‘लक्ष्मण नगरी’ होणार !

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी लखनऊ शहराचे नाव बदलण्यावरून मोठे विधान केले आहे.ते म्हणाले की, लखनऊबद्दल हे सर्वांना माहिती आहे की,ते लक्ष्मणांचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.उत्तरप्रदेशातील भदोही दौऱ्यावर असताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पटेल यांचा भदोही जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी दौरा सुरू आहे.
यामध्ये त्यांनी सुरियावा येथे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.लखनऊचे खासदार संगम लाल गुप्ता यांनी मागणी केली आहे की, लखनऊचे नाव बदलण्यात यावे.त्या मागणीवर उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी हे विधान केले.
भाजपचे खासदार संगम लाल गुप्ता यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनऊचे नाव बदलून ‘लखनपूर किंवा लक्ष्मणपूर’करण्याची मागणी केली. त्रेतायुगात या शहराला पूर्वी लखनपूर आणि लक्ष्मणपूर असे नाव देण्यात आले होते, असे सांगून भाजप खासदाराने दावा हा दावा केला. तर नवाब असफ-उद-दौला यांनी लखनऊ नाव केले होते.त्रेतायुगात श्रीरामांनी लक्ष्मणांना शहर भेट दिल्याची आख्यायिकागुप्ता म्हणाले की, लखनऊ हे.त्रेतायुगात भगवान राम यांनी त्यांचा भाऊ व अयोध्येचा राजा लक्ष्मण यांना भेट म्हणून दिले होते,
म्हणूनच हे शहर लखनपूर आणि लक्ष्मणपूर म्हणून ओळखले जात होते.
उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ जी स्थानिक मान्यतेनुसार मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम यांनी त्रेतायुगात अयोध्या राजा लक्ष्मण यांना भेट म्हणून दिली होती.त्या कारणास्तव तिला लखनपूर आणि लक्ष्मणपूर असे नाव देण्यात आले.अशा माहितीचे पत्र अमित शहांकडे देण्यात आले आहे.दुसरीकडे राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडल्याचे ब्रजेश पाठक यांनी आरोप केला. कोळसा घोटाळे,कॉमनवेल्थ घोटाळे आणि अनेक मोठे घोटाळे काँग्रेस सरकारच्या काळात झाले.काँग्रेस हा केवळ कौटुंबिक पक्ष आहे.मोदी सरकारवर आरोप करणारे राहुल गांधींचे संतुलन बिघडल्याची टीका केली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या