संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

आता मुंबई-पुणे मार्गावर धावणार सर्वात वेगवान ‘वंदे भारत ट्रेन’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – लवकरच देशातील रेल्वे रुळांवर नवीन डिझाईन आणि आधुनिक सुविधांसह सर्वात वेगवान अशा दोन ‘वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन’ धावणार आहेत. त्यापैकी एक वंदे भारत ट्रेन ही महाराष्ट्रातील मुंबई-पुणे मार्गावर धावणार आहे. त्यामुळे तीन तास १० मिनिटांचे अंतर अवघ्या अडीच तासांत कापले जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नसली तरी दोन्ही गाड्या १५ ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. दुसरी गाडी मुंबई आणि पंजाब दरम्यान चालवली जाणार आहे.

सध्या वंदे भारत गाड्यांमध्ये बसण्याची व्यवस्था म्हणून फक्त चेअर कार आहेत आणि म्हणूनच मुंबई-पुणे मार्ग निवडण्यात आला आहे. तसेच वंदे भारतचा दुसरा टप्पा एसी स्लीपरसह मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पंजाबमधील फिरोजपूर कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानक असा असणार आहे. या दोन्ही गाड्यांच्या देखभालीसाठी माझगाव आणि जोगेश्वरी येथील वाडी बंदर रेल्वे यार्डचा वापर केला जाणार असून मे महिन्यातच तसे पत्र रेल्वे मंत्रालयाने विभागीय रेल्वेला पाठवले आहे. सध्या मुंबई-पुणे दरम्यानचे अंतर डेक्कन क्वीन ही गाडी तीन तास १० मिनिटांत पार करते. हेच अंतर वंदे भारत गाडी अडीच तासांत पूर्ण करणार असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही नवीन गाडी मुंबई-पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांना अत्यंत उपयोगी पडणार आहे. त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे. सध्या ११५ कोटी रुपये खर्चून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तयार केली जात आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर डबे तयार केल्यानंतर किंमतीत लक्षणीय घट होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय रेल्वेने ऑगस्ट २०२३ पर्यंत ७५ वंदे भारत गाड्यांचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या देशात दिल्ली ते कटारा आणि दिल्ली ते वाराणसी अशा दोन वंदे भारत गाड्या चालवल्या जात आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami