अल्बेनी : अनिश्चित आर्थिक वातावरणामुळे विविध उद्योगांमधील कंपन्यांना अस्वस्थता आली आहे. त्यामुळे ट्विटर, ॲमेझॉन, फेसबुक या कंपन्यांच्या पाठोपाठ आता पेप्सिको कंपनीही कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा विचार करत आहे.संस्थेला अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने कंपनीने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.मात्र पेप्सिकोच्या प्रवक्त्याने अद्याप नोकरकपातीबाबत कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.
ॲमेझॉन, अॅपल आणि मेटा या मोठ्या टेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले जात आहे. त्यानंतर आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या म्हणण्यानुसार, पेप्सिको इंक आपल्या न्यूयॉर्क मुख्य कार्यालयाच्या स्नॅक आणि पेय युनिटमधून १०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेमोमध्ये, पेप्सिकोने कर्मचाऱ्यांना सांगितले की नोकरकपातीचे उद्दिष्ट संस्थेला मजबूत करणे आहे. जेणेकरून अधिक कार्यक्षमतेने काम करू शकू.याशिवाय शीतपेय व्यवसायातील ही कपात खूप मोठी असेल कारण स्नॅक्स युनिटने आधीच स्वेच्छा सेवानिवृत्ती कार्यक्रमासह नोकरकपात केली आहे.