संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

आझाद मैदानावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा 20 सप्टेंबरला मोर्चा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी आणि रिक्त पदे त्वरित भरावी, या मागण्यांसाठी राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी अंगणवाडी संघटना मोर्चे काढण्यात येत आहेत. याचा एक भाग म्हणून मुंबईतील आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांचा 20 सप्टेंबर रोजी भव्य मोर्चा धडकणार आहे.

राज्यामध्ये सेवानिवृत्त झालेले 6500 कर्मचारी, मृत्यू पावलेले 1650 कर्मचारी यांना सेवा समितीच्या लाभाची रक्कम मिळाली नाहीये. त्यांच्या वारसांना सेवेमध्ये अद्यापही घेतलेले नाहीये. म्हातारपणी त्यांची उपासमार होते. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ हे तातडीने दुसऱ्या दिवसापासून मिळाला हवे. अशा अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केले असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होत आहे. या आंदोलनाचा समारोप 20 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात होणार आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ नेते एम. ए. पाटील सांगितले की, 20 आणि 30 वर्षे सेवा झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार शासन आदेशानुसार त्या रीतीने मानधन वाढ फरकासह दिली जावी. शासकीय वेतनश्रेणी सुद्धा मिळावी. तसेच अनेक कल्याणकारी मागण्या शासनाने अद्याप मान्य केलेला नाही. त्यामुळे शासनासमोर गाऱ्हाणे मांडण्यासाठी आम्ही राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदानामध्ये काढणार आहोत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami