संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 29 September 2022

आझम खान यांच्या पत्नी आणि मुलाला ईडीचे समन्स, १५ जुलैला चौकशी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ – समाजवादी पक्षाचे आमदार आझम खान यांची पत्नी ताझीन फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला आझम यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. रामपूरमधील जौहर विद्यापीठ प्रकरणात त्यांना १५ जुलै रोजी झोनल मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्या इतर नातेवाइकांनाही समन्स पाठवण्यात येणार असल्याचे कळते आहे. विद्यापीठाला निधी देण्याच्या नावाखाली मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

ईडीने या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत आझम खान यांच्याविरोधात १ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीतापूर तुरुंगात त्यांची चौकशीही झाली होती. तुरुंगात सुमारे २७ महिने राहिल्यानंतर ते २० मे २०२२ रोजी बाहेर आले होते. दरम्यान, आता विद्यापीठाच्या नावाने निधी उभारणे आणि पैसे हस्तांतरित केल्याप्रकरणी ईडीकडून आझम खान यांच्या कुटुंबीयांची चौकशी होणार आहे. ताझीन आणि अब्दुल्ला यांच्या बँक खात्यातील व्यवहारांचीही ईडी चौकशी करणार आहे. दरम्यान, अब्दुल्ला हे रामपूरच्या स्वार मतदारसंघाचे आमदार आहेत, तर ताझीन या रामपूरच्या माजी आमदार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami