संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

आज साताऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा वाहतुकीच्या मार्गात बदल केला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सातारा- सातारा शहरात उद्या रविवार १८ सप्टेंबर रोजी हिल हाॅफ मॅरेथाॅन स्पर्धा हाेणार आहे.ही स्पर्धा सकाळी सहा ते दहा या कालावधीत हाेणार असल्याने स्पर्धा मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आल्याची माहिती वाहुतक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पाेलीस निरीक्षक व्ही.ए.शेलार यांनी दिली. या स्पर्धेत सुमारे आठ हजार स्पर्धक धावण्याची शक्यता असल्याने त्यांना प्राेत्साहन देण्यासाठी माेठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी हाेण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्पर्धक व नागरिकांच्या दृष्टीने सातारा शहरातील अंतर्गत वाहतुकीचे नियमन व वाहनांचे पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी एसपी अजय कुमार बन्सल यांनी उपयायाेजनांचे आदेश दिले आहेत.दरम्यान कास पठार पाहण्यासाठी येणा-या पर्यटकांना सकाळी अकरानंतरच यवतेश्वर घाटात प्रवेश मिळणार आहे. पाेलीस कवायत मैदान, पाेवई नाका ,मरिआई काॅम्पलेक्स, शाहू चाैक, अदालत वाडा मार्गे समर्थ मंदिर,बाेगदा,यवतेश्वर, प्रकृती हेल्थ रिसाॅर्ट या मार्गावर केवळ रुग्णवाहिका, पाेलीस वाहने,अग्निशामक दल या वाहनांना परवानगी राहील.अन्य सर्व वाहनांना स्पर्धा कालावधीत प्रवेश बंद राहील असे पाेलिस दलाने कळविले आहे.यावेळी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
शिवराज पेट्राेल पंप, अंजठा चाैक व गाेडाेली मार्गे सातारा शहरात येणारी सर्व वाहने ग्रेड सेपरेटर मार्गाने डी.बी.कदम मार्केट,राधिका सिग्नल येथून सातारा शहरात ये-जा करतील.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami