संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात रिषभ पंतच्या भारतीय संघासमोर करो या मरोची स्थिती असणार आहे.५ सामन्यांच्या या मालिकेत आफ्रिकन संघ १-० फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला आज कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हावे लागणार आहे. आज संध्याकाळी ७ वाजता ही लढत खेळवली जाईल.

यापूर्वी दिल्लीत झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात द्विशतकी मजल मारल्यानंतरही भारताला पाहुण्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७ गड्यांनी पराभव पत्करावा लागला होता. यासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर ४ बाद २११ धावा उभारल्या. मग दक्षिण आफ्रिकेने भारताने दिलेले लक्ष्य १९.१ षटकांत केवळ ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. त्यामुळे आज दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरताना कर्णधार पंतसमोर गोलंदाजीची मुख्य चिंता असणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami