संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 05 February 2023

आज ’बुर्ज खलीफा’ इतक्या लांबीचा
महाकाय लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

प कॅलिफोर्निया – उद्या 1 नोव्हेंबरला पृथ्वीच्या अगदी जवळून एक महाकाय लघुग्रह प्रचंड वेगाने जाणार आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार या लघुग्रहाची लांबी जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘बुर्ज खलीफा’ इतकी आहे. या लघुग्रहाचे नाव ‘2022 आरएम 4’ असे आहे.नासाच्या ‘सेंटर फॉर नियर अर्थ स्टडिज’ विभागाने दिलेल्या माहितीनुसार या लघुग्रहाचा व्यास अंदाजे 330 ते 740 मीटर अथवा 2400 फूट इतका असू शकतो. खगोल शास्त्रज्ञांच्या मते, हा लघुग्रह पृथ्वीजवळून जाणार असे सांगण्यात येत असले तरी ज्यावेळी तो पृथ्वीच्या अगदी जवळ येईल, त्यावेळी या दोहोंमधील अंतर 1.5 ते 2.5 मिलियन किमी इतके असेल. लघुग्रह हा तार्‍याचा एक तुकडाच असतो आणि तो सूर्याच्या चारही बाजूने समकक्षेत फिरत असतो. ‘लाईव्ह सायन्स’ने यासंदर्भात सांगितले की, ‘2022 आरएम 4’ हा लघुग्रह पृथ्वीजवळून ताशी 52,500 मैल प्रचंड वेगाने निघून जाणार आहे. कोणतीही अवकाशीय वस्तू पृथ्वीच्या 120 मिलियन मैल इतक्या अंतरापर्यंत पोहोचते, अशा वस्तूंना ‘पृथ्वीजवळून जाणारी खगोलीय वस्तू’ म्हणून ओळखली जातेे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami