संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

आज नवरात्रीच्या रंग पांढरा, आजचा विषय – पांढरा कांदा!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

देशात पांढरा, लाल, पिवळा असे कांद्याचे तीन प्रकारचे रंग आहेत. कांद्यात असलेल्या एन्ट्रोसायजिंग या रंगद्रव्यामुळे कांद्याचा रंग लाल होतो. पांढऱ्या कांद्यात हे रंगद्रव्य नसते. चवीला तो कमी तिखट असतो. युरोपमध्ये पिवळा व पांढरा कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो. मात्र अन्यत्र लाल कांद्याचीच चलती आहे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये लाल कांदा वापरला की रंग बदलतो पण पांढरा कांदा वापरला की, रंग तोच राहतो. त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योगात पांढऱ्या कांद्याला अधिक मागणी आहे. आता बाजारात रेडी टु इट प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यात पांढरा कांदाच वापरला जातो. पांढऱ्या कांद्याचे काप मोठ्या हॉटेलमध्ये मिळतात. पांढऱ्या कांद्याचे वैशिष्ट्य म्हणजे तिखटपणा. रुचकर चव आणि औषधी गुणधर्मामुळे नावारूपाला आलेला अलिबागचा पांढरा कांदा निर्यातही होतो. उन्हाळ्यात पांढऱ्या कांद्याला विशेष मागणी असते. पांढरा कांदा हा माळे प्रमाणे विकला जातो.

ठाणे जिल्ह्यातील वसई आणि नाशिक जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. परंतु अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा इतर ठिकाणी होणाऱ्या कांद्यापेक्षा वेगळा आहे. इतर ठिकाणी होणारा पांढरा कांदा तिखट असतो. त्या तुलनेत अलिबाग तालुक्यात होणारा पांढरा कांदा कमी तिखट असतो. अलिबाग तालुक्यातील काही गावांपुरते मर्यादित असणारे हे पीक आता, वाढती मागणी आणि चांगला भाव यामुळे जिल्ह्य़ातील इतर तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

पांढऱ्या कांद्याला औषधी गुणधर्म आहे. जर सर्दी किंवा कफची समस्या असेल तर ताज्या कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते. रोज कांदा खाल्ल्याने इन्शुलिन निर्माण होते. हे मधुमेह रोगावर परिणाम करते. कच्च्या कांद्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमीनो ऍसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींपासूनही दूर ठेवते. रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरताही दूर होते. यामुळे ऍनिमियाही दूर होतो. पांढरा कांदा निर्जलीकरण, पावडर व पेस्ट तयार करण्यासाठी वापरला जातो.

  • – संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami