मुंबई – वसुंधरा फौंडेशन ,मिशन ओन लाईन स्वराज्य आणि ब्रीदिंग रुट्स या तीन सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आपले समुद्र किनारे वाचविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेंतर्गत उद्या रविवार २ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत दादर चौपाटीवर ‘ स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ” उपक्रम आयोजित केला आहे.
या मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी दादर पश्चिमेला राहणाऱ्या नागरिकांना या तिन्ही संस्थांच्या प्रमुखांनी आवाहन केले आहे.या उपक्रमानुसार शिवाजी पार्क ,दादर चौपाटीच्या किनाऱ्यावर उद्या सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.महाराष्ट्र राज्याला सुमारे ७२० किलोमीटरचा समुद्र किनारपट्टी लाभली आहे.हे समुद्र किनारे सतत अस्वच्छ असतात.नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जन सोहळ्यानंतर तर अनेक समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचलेला आहे.
त्यामुळे या किनाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे असे समुद्र किनारे स्वच्छ राखण्याचे काम या तिन्ही संस्था विशेष मोहीम हाती घेत करत असतात.