संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 October 2022

आज औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार; सभेकडे राज्याचे लक्ष

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

औरंगाबाद – मराठवाड्यातील शिवसेनेच्या पहिल्या शाखा स्थापनेला आज, ८ जून रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्ताने ‘हिंदुत्वाचा हुंकार’ या घोषवाक्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. अखेर आज तो सभेचा दिवस उजाडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य करणार का? कोणत्या मोठ्या घोषणा करणार? कोणाच्या टीकेला उत्तर देणार? याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत.

खासदार संजय राऊत, मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री सुभाष देसाई, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधी या सभेला उपस्थित राहणार आहेत. सभेसाठी शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली असून शहरात १० हजार भगवे ध्वज, २०० होर्डिंग, स्वागत बॅनर, चौकाचौकांत सर्वत्र भगवे ध्वज फडकविण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सभा झाली होती. त्या सभेप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठीही पोलिसांनी १५ अटी-शर्ती लागू केल्या आहेत. या सभेदरम्यान त्यांचे पालन करणे बंधनकारक असेल. तसेच या सभेसाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami