संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

आग्य्रातील रुग्णालयाला लागलेल्या आगीत डॉक्टरसह तिघांचा मृत्यू

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

आग्रा – उत्तर प्रदेशच्या आग्राजवळच्या आर. मधुराज रुग्णालयाला आज पहाटे ५ च्या सुमारास भीषण आग लागली. त्यात रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन सिंह त्यांचा मुलगा ऋषी आणि मुलगी शालू या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. या घटनेत डॉक्टरची पत्नी आणि मोठा मुलगा जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. याशिवाय या रुग्णालयातील रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
आर. मधुराज रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत ठेवलेल्या फोमला सकाळी आग लागली. त्याच मजल्यावर रुग्णालयाचे संचालक डॉ. राजन सिंह त्यांचे वडील गोपीचंद, पत्नी मधुराज, मुलगी शालू, दोन मुलगे लवी आणि ऋषी व नातेवाईक तेजवीर होते. आग लागली तेव्हा गोपीचंद आणि लवी यांना जाग आली. गादीच्या खोलीत आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी गाद्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीने उग्ररूप धारण केल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धूर झाला. डॉक्टर राजन यांनी गेट बंद केले होते. त्यामुळे ते कुटुंबासह अडकले आणि धुराने गुदमरले. त्यात डॉक्टर राजन, त्यांची मुलगी शालू आणि मुलगा ऋषी या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. मोठा मुलगा लवी याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची पत्नी मधुराज यात जखमी झाली असली तरी तिची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर रुग्णालयातील रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami