संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

आगामी आयपीएल – २०२३ स्पर्धेचा लिलाव १६ डिसेंबरला बंगळुरूमध्ये

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली- इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल म्हणजे जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे.त्यामुळे या लीगचे सामनेच नाही तर लिलावही पाहायला क्रिकेटप्रेमींना खास आवडते.आता आगामी आयपीएल २०२३ स्पर्धेसाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी बंगळुरू येथे होणार आहे, हा एक मिनी लिलाव असणार असून मागील वर्षीच्या मेगा लिलाव तुलनेत छोटा असणार आहे. पण असे असले तरी यंदाही काही मोठे बदल यंदाही होण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२२ च्या महालिलावावेळी संघाना ९० कोटी इतकी रक्कम देण्यात आली होती. यंदा ही रक्कम ९५ कोटी असून संघ आपल्या खेळाडूंच्या ट्रेडींगनंतर ही रक्कम कमी-जास्त होऊ शकते.मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलची स्पर्धा निर्बंधाखाली झाली होती, त्यानंतर आयपीएल २०२२ प्रेक्षकांसह झाली असली तरी आता निर्बंध आणखी कमी झाल्याने यंदाचा हंगाम आणखी दमदाररित्या पार पडणार अशी दाट शक्यता आहे. यंदाही १० संघ असणार असून नव्या दोन संघामुळे आयपीएल २०२२ रंगतदार झाली ज्यानंतर यंदाही आयपीएल २०२३ आणखी चुरशीची होईल हे नक्की.आयपीएल २०२३ मध्ये काही मोठे बदल होऊ शकतात.चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा हा संघ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच इतरही काही मोठे खेळाडू संघबदल करु शकतात. त्यामुळे हा लिलाव पाहण्याजोगा असेल.
आगामी आयपीएल २०२३ स्पर्धेसंबधित बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वीच एक नवी घोषणा केली. गांगुली यांनी सांगितले की, ”मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे.ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे ७ सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत ७ सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत.तसेच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे.आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami