संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या मालदीवमधील कार्यक्रमावर हल्ला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

माले – आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालदीवची राजधानी माले येथील नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर आज सकाळी ६.३० वाजता आयोजित केलेल्या योगाच्या कार्यक्रमावर हल्ला झाला. मुस्लीम आंदोलकांनी साधकांना स्टेडियममधून पिटाळले. त्यांना धमकावले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६ आंदोलकांना अटक करण्यात आली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज मालदीवच्या नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर योगाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अनेक साधकांनी भाग घेतला होता. मात्र काही मुस्लिम संघटनांचा याला विरोध होता. त्यांच्या आंदोलकांनी यावर हल्ला चढवला. त्यामुळे स्टेडियममध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणी आतापर्यंत ६ आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह यांनी दिले आहेत. मालदीवमध्ये काही दिवसांपासून भारतविरोधी आंदोलने होत आहेत. तेथील काही मुस्लीम संघटनांचा योगाला विरोध आहे. केवळ अल्लाहवरच विश्वास ठेवला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami