संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १२३ डॉलर पार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर १२३ डॉलर प्रति बॅरल पार झाले आहेत. सोबतच डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरू आहे. त्यामुळे आता गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असणारे पेट्रोल, डिझेलचे भाव पुन्हा एकदा कडाडण्याची भीती निर्माण झाली आहे.

कच्च्या तेलाच्या किंमतींवरून जगभरात गोंधळ सुरू असून आता हा भाव १२३.९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. भारताला वर्षभर तेल १०५ डाॅलर प्रति बॅरलने खरेदी करावे लागू शकते, असे आरबीआयकडून कालच स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आणि त्याचे भाव गगनाला भिडले. त्यातच अमेरिकेतील वाढती मागणी आणि जूनच्या सुरुवातीपासून चीनमध्ये शिथील होऊ लागलेलं लॉकडाऊन, यामुळे महिन्याभरात चीनमधून येणारी कच्च्या तेलाची मागणीही पुन्हा पूर्वपदावर येईल, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय तेल बाजारात सुरू आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. तसेच ओपेक संघटनांकडून तेलाच्या मागणीची पूर्तता होत नसल्याने बाजारातील पुरवठ्यात घट आणि मागणीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. मात्र ओपेक देशांच्या समूहाने कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज जवळपास साडे सहा लाख बॅरलनी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर काहीसे खाली आले. परंतु दरांमध्ये आलेली घसरण तात्पुरतीच असल्याचे दिसत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami