संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला परतण्याचे आदेश

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन:- दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कामावर येण्याचे आदेश दिले आहेत. हा नवीन नियम येत्या १ मे पासून लागू होणार आहे. हा आदेश अ‍ॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी दिला आहे.

अ‍ॅमेझॉन ही अमेरिकन कंपनी जगभरामध्ये आपली सेवा पुरवते. या कंपनीचे कर्मचारी प्रत्येक देशामध्ये आहेत. करोना काळामध्ये या कंपनीने कर्मचाऱ्यांना घरुन ‘वर्क फ्रॉम होम; करण्यास सांगितले होते. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सोयीनुसार घरुन किंवा ऑफिसमधून काम करायची मुभा दिली. याबाबत निर्णय त्या-त्या विभागातील सदस्य मिळून घेऊ शकत होते. आता या निर्णयामध्ये नवा बदल करत आठवड्यातून निदान ३ दिवस ऑफिसला जाऊन तेथून काम करण्याचे आदेश दिले आहे.भारतामध्ये बंगळुरु, चैन्नई, हैदराबाद, मुंबई, पुणे या शहरांमध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीची कार्यालये आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या