संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांना केंद्राकडून मुदतवाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – ज्येष्ठ वकील के.के. वेणुगोपाल यांना अ‍ॅटर्नी जनरल म्हणून केंद्र सरकारकडून आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. वेणुगोपाल यांनीही तीन महिने मुदतवाढीस सहमती दर्शवली आहे. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ उद्या 30 जून रोजी संपणार होता.

अ‍ॅटर्नी जनरलचा कार्यकाळ साधारणपणे तीन वर्षांचा असतो. अ‍ॅटर्नी जनरल म्हणून वेणुगोपाल यांचा पहिला कार्यकाळ 2020 मध्ये संपणार होता. तेव्हा त्यांनी सरकारला त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून त्यांना एक वर्षाची मुदत देण्याची विनंती केली होती. गेल्या वर्षीही वेणुगोपाल यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवण्यात आला होता. वेणुगोपाल हे सुप्रीम कोर्टात चर्चेत असलेली प्रकरणे हाताळत आहेत. यात कलम 370 ला संवैधानिक आव्हान, कलम 124-अ अंतर्गत देशद्रोहाचा खटलादेखील समाविष्ट आहे. वेणुगोपाल यांचा अनुभव लक्षात घेऊन सरकारने त्यांना आणखी एक टर्म देण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यांची पुन्हा तीन महिन्यांसाठी या घटनात्मक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami