संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अहमदनग-आष्टी पहिल्या रेल्वेचे 23 सप्टेंबरला लोकार्पण सोहळा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदनगर- अहमदनगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे २३ सप्टेंबरला होणार आहे. बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे.याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी अनेकवेळा या रेल्वे उद्घाटनाचे मुहूर्त ठरले होते. मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला होता.

बीड जिल्ह्यातील जनतेचा आष्टी- रेल्वे हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. नगर परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते. अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान सात कि.मी.अंतरावर मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती. नंतर अहमदनगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या १५ कि.मी. अंतरावर 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली. मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली होती.

बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.1995 साली नगर बीड परळी रेल्वे मार्गला मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले.भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथमुंडे यांनी बीड जिल्हावासियांना बीड रेल्वे चे स्वप्न दाखवले होते. त्यांनी या रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान दिले होते.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami