संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 31 January 2023

‘असं’ जाणून घ्या तुमच्या हृदयाचं खरं वय!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

तुम्हाला तुमच्या हृदयाचे खरे वय माहित आहे का? आपल्या हृदयाचे वय निश्चित करण्यात विविध घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यक्तीच्या हृदयाचे वय हे रक्तदाब पातळी, धूम्रपान आणि वजन यासारख्या गोष्टींवर आधारित असते. हे जाणून तुम्हाला धक्का बसेल की तुमच्या हृदयाचे वय हे तुम्हाला हृदयरोगाच्या संभाव्यतेबद्दल देखील सांगू शकते. आपल्या निरोगी हृदयासाठी अचूक जीवनशैली स्वीकारणे अत्यावश्यक आहे. यौविषयी अधिक माहिती देत आहेत सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कार्डिओ-थोरॅसिक सर्जन डॉ. बिपीनचंद्र भामरे.

हृदयाच्या वयाची गणना कशी करावी?

हृदयाच्या वयाची गणना केल्याने तुम्हाला स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक सारख्या विविध जोखीम घटक समजण्यास मदत होईल. अशाप्रकारे, तुमचे वय, बीएमआय, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे स्तर, आहार, शारीरिक हालचाली आणि धूम्रपान यांसारख्या हृदयरोगासाठी तुमच्या जोखमीच्या घटकांवर आधारित हृदयाचे वय मोजले जाऊ शकते. हृदयाचे वय कमी असल्यास हृदयरोगाचा धोका कमी असू शकतो. जर तुमच्या हृदयाचे वय जास्त असेल तर तुम्हाला निरोगी जीवनशैलीतील बदलांचा स्वीकार करावा लागेल.

आपल्या हृदयाचे वृद्धत्व कमी करण्यासाठी काय करता येईल?

दररोज व्यायाम करा: शारीरिकरित्या सक्रिय असणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकार करणे आवश्यक आहे. आठवड्यातून किमान 5 दिवस अर्धा तास व्यायाम करा. आपण एरोबिक्स, पोहणे, सायकलिंग, व्यायामाचे प्रशिक्षण, पायलेट्स, योग किंवा चालणे यासारखे व्यायाम करू शकता. तसेच योग्य वजन राखण्यास विसरू नका.

निरोगी आहाराचे सेवन करा: आपल्या आहारात सर्व पोषक घटक समाविष्ट करणे गरजेचे आहे. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य, शेंगा, डाळी, सुकामेवा, बीन्स खा. भरपूर बेरी, सफरचंद, भोपळ्याच्या बिया, एवोकॅडो, पालक, ब्रोकोली, गाजर, टोमॅटो आणि लिंबूवर्गीय फळे खा,ट्रान्स फॅट्सचे सेवन मर्यादित करा. शर्करायुक्त पदार्थ आणि पेयांचे सेवन टाळा. पुरेसे पाणी प्या आणि नियमितपणे फास्ट फूड खाणे टाळा.

तणावमुक्त रहा: तणाव तुमच्या हृदयावर परिणाम करू शकतो. यामुळे उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढु शकते जे पुढे हृदयरोगास आमंत्रित करू शकते. म्हणून, ध्यान, श्वासोच्छवासाचे व्यायाम आणि तुम्हाला आवडणारे छंद जोपासा.

धूम्रपान टाळा – जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते सोडण्याची ही योग्य वेळ आहे. धूम्रपान केल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका तसेच स्ट्रोकसारख्या समस्या होण्याचा धोका वाढतो. अल्कोहोलचे सेवन टाळा.

पुरेशी विश्रांती: आपल्याला पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाबाची पातळी वाढू शकते आणि तुमच्यासाठी ते अतिरिक्त किलो कमी करणे कठीण होऊ शकते. किमान 8 तासांची झोप तुमच्या हृदयासाठी चांगली आहे.

जोखीम घटकांचे नियंत्रण: जर तुम्हाला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह किंवा उच्च कोलेस्टेरॉल असेल तर तुम्ही तुमच्या औषधे वेळेवर घेणे आवश्यक आहे आणि तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर वरील रोगाचे दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami