संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे सर्वच भाज्यांच्या दरात मोठी वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी मुंबई – राज्यात सर्वत्र पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वच भाज्यांचे दर वाढलेले दिसत आहेत.याठिकाणी १०० जुड्यांमागे कोथिंबीर व मेथीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर १०० किलोंप्रमाणे वांग्याच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली आहे.
तसेच टोमॅटोच्या दरात आज १६०० रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाली. सुरणच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली होती. तसेच शेवग्याच्या शेंगांचे दर दीड हजार रुपयांनी वाढले आहेत.तर ढोबळी मिरचीच्या दरात १ हजार रुपये आणि घेवड्याच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीचा परीणाम या भाज्यांच्या पुरवठ्यावर झाला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami