संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अल्प प्रतिसादामुळे “भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्राच्या ४ जिल्ह्यांतच गुंडाळणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- राहुल गांधी यांच्या “भारत जोडो यात्रे’ला महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही यात्रा ४ जिल्ह्यांतच गुंडाळली जाईल, अशी टीका भाजपने राहुल गांधी यांच्यावर केली आहे. सावरकर यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या राहुल गांधींना महाराष्ट्राची जनता अद्दल घडवेल, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ७ सप्टेंबरपासून तामिळनाडूच्या कन्याकुमारीतून “भारत जोडो यात्रे’ला सुरुवात केली. सध्या ही यात्रा कर्नाटकात आहे. पुढील वर्षी काश्मीरमध्ये तिची सांगता होणार आहे. या यात्रेला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. केरळ सारख्या छोट्या राज्यात २० दिवस राहुल गांधींची ही “भारत जोडो’ यात्रा होती. मात्र महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात ३६ पैकी केवळ ४ जिल्ह्यांत ही यात्रा गुंडाळली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यात्रेचे महाराष्ट्रात स्वागत करणार असल्याचे समजते. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रात यात्रेचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपने सावरकर यांच्याबद्दल नेहमी गरळ ओकणाऱ्या राहुल गांधींना महाराष्ट्राची जनता अद्दल घडवेल, असे सांगून यात्रेला अत्यल्प प्रतिसाद मिळणार असल्याने ती ४ जिल्ह्यातच गुंडाळली जाईल, असे म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami