संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

अलिबागमध्ये पीएनपी नाट्यगृहात अग्नितांडव

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अलिबाग- अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागल्याची घटना आज सायंकाळी घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे.

पीएनपी नाट्यगृहाला लागलेल्या आगीने बघता बघता आगीने रौद्ररुप घेत नाट्यगृहाला विळखा घातला. संपूर्ण नाट्यगृहात आगीचा भडका उडाला आहे. त्यामुळे दूर पर्यंत धुराचे लोट दिसून येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्ठळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते . स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते, त्यामुळे ही आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami