संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु कृष्णा नदीच्या पातळीत वाढ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

बेळगाव : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून आज सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एक लाख वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याशिवाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.त्यामुळे गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या चार दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार बरसत असल्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी 20 हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.. रात्री 90 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 1 लाख 20 हजार करण्यात आला आहे. याशिवाय कोयना ,कण्हेर, धोम धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami