मुंबई:- दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर अडचणीत सापडले आहेत.आश्रमशाळेच्या संस्थाचालकाच्या विरोधात अर्वाच्च वक्तव्य प्रकरणी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात टेंभुर्णई पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.त्यामुळे पंढपूरमधील माढा न्यायालयाने टेंभुर्णी पोलिसांना सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या गाडीचा ज्या दुसऱ्या गाडीसोबत अपघात झाला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची होती. महेश मांजरेकर यांनी त्या संस्थाचालका विरोधात बदनामी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पंढपूरमधील माढा न्यायालयाने टेंभुर्णी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
टेंभुर्णी येथील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर यांच्या गाड्यांचा पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी सातपुतेंची बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता.