संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 28 November 2022

अरविंद केजरीवालांनी पंजाबच्या ‘आप “आमदारांना दिल्लीत बोलावले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

भाजपच्या’ऑपरेशन लोटस ” भीती

चंदीगड – महाराष्ट्रात सत्ताबदल केल्यानंतर भाजपने आता पंजाबमध्ये ‘ऑपरेशन लोटस ” ची तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्षाने भाजपवर ऑपरेशन लोटस अंतर्गत आमदारांची खरेदी आणि धमकावल्याचा आरोप केला आहे.तसेच यासंदर्भात डीजीपींकडे तक्रार केल्यानंतर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.दरम्यान,आपच्या सर्व आमदारांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. दिल्लीत पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाबच्या सर्व आमदारांची भेट घेणार आहेत.येत्या रविवार १८ सप्टेंबर रोजी आमदारांसोबत बैठक होणार आहे.
पंजाबचे अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. हरपाल चीमा यांनी त्या आमदारांची नावे प्रसिद्ध केली होती ज्यांना भाजपकडून खरेदी-विक्री किंवा धमक्या आल्याचा फोन आला होता. यासोबतच हरपाल चीमा यांनी पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांचीही भेट घेतली. अमित शाह माझे आणि माझ्या कुटुंबाचे मोठे नुकसान करतील, अशी धमकी दिली जात आहे, असा आरोप आप आमदाराने केला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये भाजपवर ‘आप’ने केलेल्या लोटस ऑपरेशनच्या आरोपांप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.माझ्या आमदारांच्या निष्ठेवर मला पूर्ण विश्वास आहे,असे ते म्हणाले होते.पोलिसांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की,राज्यातील काही आमदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पंजाब पोलिसांनी काल पोलिस स्टेशन गुन्हा नोंदविला असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami