संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अयोध्येत हातबॉम्ब सापडल्याने खळबळ

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अयोध्या- अयोध्येच्या (डोगरा कॅन्टोन्मेंट बोर्ड ) निर्मली कुंड चौकाजवळील नाल्याजवळ अनेक हातबॉम्ब सापडल्याने एकच खळबळ उडाली. एका तरुणाला झाडाझुडपांमध्ये 18 हातबॉम्ब पडलेले दिसले. त्यानंतर त्याने याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्स पथकाला दिली. सुदैवाने यासर्व ग्रेनेडच्या पिना काढल्याने मोठा अनर्थ टळला. जिथे हातबॉम्ब आढळले, तो संपूर्ण परिसर लष्कराच्या देखरेखीखाली असतो.
या ठिकाणापासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर हँडग्रेनेडचा सराव करणारे लष्कराचे केंद्र आहे. अशा स्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हातबॉम्ब मिळाल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मिलिटरी इंटेलिजन्सच्या माहितीनुसार, सापडलेला हँडग्रेनेड रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नष्ट करण्यात आले. अयोध्या पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. अयोध्येचे एसएसपी शैलेश पांडे यांचे म्हणणे आहे की, असे हँडग्रेनेड मिळाल्याची माहिती त्यांना डोगरा रेजिमेंटल सेंटरने कँट पोलिस स्टेशनला एका पत्राद्वारे दिली आहे. सर्व हँडग्रेनेड नष्ट करण्यात आले आहेत. त्यापेक्षा जास्त माहिती त्यांच्याकडे नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami