संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

अयोध्येत लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ १४ टनाची वीणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अयोध्या- स्वसम्राज्ञी दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत १४ टणांची एक वीणा बनवली आहे.त्याच बरोबर अयोध्येच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या नया घाट चौकाचे लता मंगेशकर चौक असे नामांतर करण्यात आले आहे.

सध्या अयोध्येत राम मंदिराचे काम सुरू आहे.त्यामुळे अयोध्या नगरीत भक्तिमय वातावरण आहे. पार्श्वभूमीवर अयोध्येच्या प्रवेशद्वारावर जो मोठा चौक आहे तिथे 40 फूट उंचीची एक मोठी वीणा बसवण्यात आली आहे.अयोध्या नगरीत प्रवेश करणाऱ्यांना लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजातील भजनाचे स्वर एकायला मिळतील.तसेच लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ जी वीणा बनवण्यात आली आहे ती 40 फूट उंच आणि १० फूट रुंद आहे. त्यावर लक्ष्मी आणि सरस्वती त्यांच्यासह मोराचेही चित्र आहे.ही वीणा ७० कलाकारांनी तयार केलेली आहे.८ कोटी रुपये खर्च करून बनवण्यात आलेल्या या विणेचे २८ सप्टेंबरला युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.विशेष म्हणजे या स्मृती चौकसाठी जागतिक डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अनीलराम सुतार यांनी ही भव्य वीणा बनवली आहे आणि त्यात लाईट सावूंड शोची खास व्यवस्था आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami