संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

अयोध्येतील चौकाला लता दीदींचे नाव 40 फुटी वीणेचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

लखनऊ- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंती दिनी अभिवादन केले आहे. याच पार्श्वभूमीवर, अयोध्येतील एका चौकाला लता मंगेशकर यांचे नाव देण्यात आले आहे. त्याशिवाय या चौकात एक 40 फूट आणि 14 टन वजनाच्या वीणेची मूर्ती ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मूर्तीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या आठवणीला उजाळा देत म्हटले की, दीदींचे जाणे हे तमाम भारतीयांच्या काळजाला छेद करुन जाणारी गोष्ट होती. मात्र त्यांचे सूर हे आपल्या मनात घर करुन आहे. त्यांच्या सुरावटीत आपण प्रत्येक जण चिंब झाल्याची भावना मोदींनी यावेळी व्यक्त केली आहे.दीदी म्हणायच्या माणूस त्याच्या कर्माने मोठा होतो. दीदींनी त्यांच्या स्वरांनी सार्‍या जगाला जोडले. अयोध्येतल्या चौकाला लता दीदींचे नाव देण्यात आले आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.
तसेच मोदींनी ट्विट देखील केले आहे. त्यांनी लिहिले की, लतादीदींना जयंतीनिमित्त अभिवादन. मला खूप काही आठवत आहे.
असंख्य संभाषणे ज्यात त्यांनी खूप आपुलकीचा वर्षाव केला. आज अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे, याचा मला आनंद आहे. महान भारतीय व्यक्तिमत्वाला खरी श्रद्धांजली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami