संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

अमेरिकेत ॲपल स्टोरची युनियन कर्मचाऱ्यांच्या बहुमतानं प्रस्ताव मंजूर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली : युएस ॲपल स्टोर च्या बहुसंख्य कर्मचार्‍यांनी युनियन तयार करण्यासाठी मतदान केले असून,बहुमतानं प्रस्ताव मंजूर केला आहे. अमेरिकेच्या मेरीलँडच्या टॉक्सन येथील मेरीलँड ॲपल स्टोरच्या कर्मचाऱ्यांचे युनियन तयार करण्यावर एकमत झाले आहे. मतदानाची देखरेख करणार्‍या फेडरल एजन्सीने शनिवारी प्रसारित केलेल्या थेट मोजणीनुसार, स्टोरमधील ११० कर्मचार्‍यांपैकी ६५ लोकांनी बाजूने आणि ३३ लोकांनी विरोधात मतदान केले.

ॲपलकोर नावाच्या कर्मचार्‍यांच्या गटाने युनियन तयार करणासाठी प्रचार केल्यानंतर हे मतदान घेण्यात आले. यावर कर्मचाऱ्यांनी बहुमतानं युनियन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानाची देखरेख करणार्‍या फेडरल एजन्सीने शनिवारी प्रसारित केलेल्या थेट मोजणीनुसार.ॲपलकोर ने ट्विट करत म्हटलं आहे की, ‘आम्ही युनियन तयार करण्याचा प्रस्ताव बहुमतांनी जिंकला आहे. ज्यांनी यासाठी कठोर परिश्रम केले आणि समर्थन केले त्यांचे आभार. आमच्यासाठी हा क्षण उत्सव साजरा करण्यासारखा आहे.’ तसेच ट्विट करत म्हटलंकी, ‘एजन्सीने निकाल जारी केल्यानंतर मशीनिस्ट आणि एरोस्पेस कामगारांची आंतरराष्ट्रीय संघटना युनियनने स्वतःची शाखा स्थापन करावी.’ दरम्यान, आयएएम ची आंतरराष्ट्रीय अध्यक्ष रॉबर्ट मार्टिनेझ ज्युनियर यांनी कामगारांच्या धाडसाचं कौतुक करत म्हटलं की, ‘मी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना निवडणुकीच्या निकालांचा आदर करत टॉवसन येथील कर्मचाऱ्यांची युनियन तयार करण्यासाठी जलद पाऊलं उचलावीत.’

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami