संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 04 December 2022

अमेरिकेत ४ भारतीयांचे मृतदेह सापडले तीन दिवसांपूर्वी झाले होते अपहरण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कॅलिफोर्निया – अमेरिकेत अपहरण झालेल्या चार भारतीयांचे मृतदेह सापडले आहेत.अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून तीन दिवसांपूर्वी या ४ जणांचे अपहरण झाले होते. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरूच असतानाच अपहरण झालेल्या चारही जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरम्यान,अमेरिकन पोलिसांनी एका ४८ वर्षीय संशयिताला अटक केली होती.ज्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मृतांमध्ये एका ८ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे.
कॅलिफोर्नियामध्ये चार भारतीयांचे सोमवारी मर्सिड काउंटीमधून अपहरण करण्यात आले होते.यात ८ महिन्यांची मुलगी आणि तिच्या पालकांचाही समावेश होता.दरम्यान पोलिसांकडून त्यांचा तपास सुरू असतानाच जसदीप सिंग ( ३६)​, ​जसलीन कौर ( २७) त्यांची ८ महिन्यांची मुलगी आरोही ढेरी,अमनदीप सिंग (३९) यांचे मृतदेह आढळून आले आहेत.एका अहवालानुसार, मंगळवारी सकाळी गुप्तहेरांना माहिती मिळाली की,अपहरण झालेल्या महिलेचे बॅंक कार्ड अटवॉटर, मर्सिड काउंटी येथील एटीएममध्ये सापडले आहे. तर सोमवारी अपहरण झालेल्या दिवशी मर्सिडच्या बाहेरील ग्रामीण भागात जळत असलेला ट्रक कॅलिफोर्नियाच्या अग्निशमन विभागाने जप्त केला होता. हा ट्रक अमनदीप सिंग यांचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami