न्यूयॉर्क – अमेरिकेसारख्या जागतिक बलाढ्य आणि पुढारलेल्या देशाच्या इतिहासात प्रथमच दोन महिलांची सही असलेली डॉलरची १ व ५ रुपयांची नोट चलनात येत आहे. या दोघीही मोठ्या पदावर आहेत. यापैकी एक आहे अर्थमंत्री जेनेट येलेन तर दुसरी कोशाध्यक्ष मेरीलीज मलेरबा आहे.या दोघींच्या सह्या १ व ५ डॉलर्सच्या नोटा चलनात जारी केल्या जाणार असून साधारण जानेवारी २०२३ मध्ये त्या बाजारात दाखल होतील असे समजते.
अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिला अर्थमंत्री म्हणून जेनेट यांची निवड झाली आहे. जेनेट सांगतात,’ माझ्या पूर्वी गेथर अर्थमंत्री होते, त्यांची सही फारच खराब होती. त्यावरून त्यांची चेष्टा केली जात असे. त्यामुळे गेथर यांना आपली सही वैध आहे हे दाखविण्यासाठी सही मध्ये बदल करण्याची वेळ आली होती. मी मात्र सहीची चांगली प्रॅक्टीस केली आहे.’ जेनेट यांच्या सहीच्या नोटा फेडरल रिझर्व कडे डिसेंबर मध्ये येतील आणि त्यानंतर २०२३ च्या सुरवातीला त्या बाजारात येतील.येलेन युएस ट्रेझरीच्या हेड सुद्धा आहेत. कारण अमेरिकेत युएस ट्रेझरी हेड हाच देशाचा अर्थमंत्री असतो