संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 25 September 2022

अमेरिकेतील कोरोना संपला
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची घोषणा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वॉशिंग्टन – गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेक देशांना लॉकडाऊन लागू करावा लागला होता. आता कोविड-19 संदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी मोठी घोषणा केली आहे. आता अमेरिकेतून कोविड-19 महामारी संपली आहे, असे बायडेन यांनी जाहीर केले आहे. त्यांनी रविवारी एका टीव्ही मुलाखतीत ही माहिती दिली.
जो बायडेन म्हणाले की, अमेरिकेतील कोरोना महामारी संपली आहे. पण तरीही आम्ही यावर खूप काम करत आहोत. जो बायडेन हॉलमध्ये बोट दाखवत म्हणाले की, येथे कोणीही मास्क घातलेला नाही. त्यामुळे मला वाटते की, हे बदलत आहे. देशातील कोविड महामारीचा प्रभावीपणे अंत झाला आहे.
जागतिक पातळीवरील एखाद्या मोठ्या नेत्याने कोविड-19 साथीच्या आजाराबाबत असे वक्तव्य सार्वजनिकपणे करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘आम्ही अजूनही कोरोना व्हायरसवर काम करत आहोत आणि अजूनही ही समस्या आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami