संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Sunday, 27 November 2022

अमृता फडणविसांच्या संस्थेकडून जुहू किनाऱ्याची सफाई मोहीम

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- आनंदचतुर्थीला गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापक अमृता फडणवीस, भामला फाऊंडेशनचे संस्थापक आसिफ भामला आणि एमसीजीएम यांच्या तर्फे जुहू किनाऱ्याच्या सफाईची मोहीम हाती घेणार आहे. सकाळी ७ वाजता सफाई मोहीम सुरु होईल. या मोहिमेत स्वच्छतेसाठी 1000 हून अधिक स्वयंसेवकही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.

जुहू समुद्र किनारा सफाई मोहिमेत भाजपाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार पूनम महाजन, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार अमीत साटम, पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि इतर आमदारांसह अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अनुपम खेर आदी या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami