संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 27 January 2023

अमृतसरमध्ये ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अमृतसर -पंजाबमधील अमृतसरमध्ये आज सोमवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले.या भूकंपाची तीव्रता ४.१ इतकी होती. आज पहाटे ३ वाजून ४२ मिनिटांनी अमृतसरसह पंजाबच्या काही भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.राष्ट्रीय भुमापनशास्त्र संस्थेनुसार, भूकंपाचे केंद्र पंजाब, पाकिस्तानमध्ये होते. भूकंपाची खोली १२० किमी असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान,यापूर्वी दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या आठवड्यात दोनदा भूकंपाचे धक्के जाणवले होते.
याआधी गेल्या एका आठवड्यात दिल्ली एनसीआरमध्ये दोनदा भूकंपांचे धक्के जाणवले होते.१२ नोव्हेंबर रोजी दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपानंतर लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर आले होते.दिल्ली,नोएडा, गाझियाबाद,बिजनौरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.यापूर्वी ९ नोव्हेंबरला भूकंप झाला होता.त्यानंतर भारत,चीन आणि नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.त्यांची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती.भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश,उत्तराखंडसह ७ राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.त्याचवेळी नेपाळमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक विध्वंस झाल्याची बातमी समोर आली होती. भूकंपामुळे केवळ अनेक घरे उद्ध्वस्त झाली होती,तर ६ जणांचा मृत्यू झाला होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami