संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 30 September 2022

अमरनाथमध्ये सांगलीतील ४७ जण अडकले! यात्रा आजही स्थगित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर : अमरनाथ गुंफेजवळ शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास झालेल्या ढगफुटीत १६ यात्रेकरुंचा मृत्यू, ६५ लोकांना वाचवण्यात यश आले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. अद्याप ४१ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे तर अनेकजण जखमी झाले असल्याचेही बातमी समोर आली असताना, अद्याप सांगलीतील ४७ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. खराब हवामानामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरु आहे. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी देखील हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेस्क्यू ऑपरेशनसाठी एनडीआरएफ ची टीम घटनास्थळी पोहचली असून एसडीआरपी च्या मदतीने रेस्क्यु ऑपरेशन सुरू असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. अमरनाथमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे येथील यात्रा स्थगित करण्यात आली असून, तिसऱ्या दिवशीही रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. तर अमरनाथ यात्रेसाठी गेलेला सांगली जिल्ह्यातील ४७ जणांचा ग्रुप अदयाप बेपत्ता आहे. अमरनाथ गुहेखाली असलेल्या तंबुमध्ये ते मुक्कामास होते. हा ग्रुप दर्शनासाठी गेला आणि अचानक ढगफुटी होऊन त्यांचे तबु गाडले गेले. दैव बलवत्त म्हणून ते सर्व बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचं सगळं साहित्य गाडलं गेलं असल्याचे समजते. काही मिनिटांसाठी ते तंबुच्या बाहेर गेल्यानं त्यांचा जीव वाचला. त्या दुर्घटनेनंतर अजुनही ते धक्क्यात असल्याचे समजते. आर्मीनं त्यांचे फोन आणि काही साहित्य शोधुन काढलं आहे. मात्र आजही हवामान खराब असल्यानं त्यांचं साहित्य वरती अडकलंय आणि हे लोक बेस कॅम्पला आले आहेत. तर दुसरीकडे हवामान खराब असल्यानं अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. यंदा ३० जूनपासून ही यात्रा सुरू झाली होती. ४३ दिवस चालणाऱ्या या यात्रेची ११ ऑगस्ट रोजी सांगता होणार होती. पण सध्या खराब हवामानामुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान,शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये अचानक झालेल्या ढगफुटीमुळे पूर आला आणि पुराच्या तडाख्यात अनेक तंबू वाहून गेले. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami